काही ही
घडलं ,
छान किंवा
वाईट
तुला पहिलं
सांगते
ती असं
कां करते
तुला कधी
कळणार नाही
ज्यांचे उत्तरं तू
देत नाही
नेहमी तिचे तेच
प्रश्नं ,
दमलेली असली तरी
पहिली तुझी काळजी
घेते ,
ती असं
कां करते
तुला कधी
कळणार नाही
ना पूर्ण
केलेलं ते "प्रॉमिस"
मोडतं तिचं मन
हसून तरी
हि बोलते
ती असं
कां करते
तुला कधी
कळणार नाही
आज तुझी
वाट पहाते
काल पेक्षा
जास्त आतुरतेने
रोज तूच
तिचा ध्यास
ती असं
कां करते
तुला कधी
कळणार नाही
तुझं , "मी फक्त
तुझाचं"
तिला जगण्याचा अर्थ देतं
आनंद असो
,त्रास असो
नावं तुझं
पहिलं येतं
तुला कळतयं सारं,
तिला कधी कळणार नाही
© जूही गुप्ते
No comments:
Post a Comment