Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

Friday, February 17, 2017

तुला कधी कळणार नाही



काही ही घडलं ,
छान किंवा वाईट
तुला पहिलं सांगते
ती असं कां करते
तुला कधी कळणार नाही

ज्यांचे उत्तरं तू देत नाही
नेहमी तिचे तेच प्रश्नं ,
दमलेली असली तरी
पहिली तुझी काळजी घेते ,
ती असं कां करते
तुला कधी कळणार नाही

ना पूर्ण केलेलं ते "प्रॉमिस"
मोडतं तिचं मन
हसून तरी हि बोलते
ती असं कां करते
तुला कधी कळणार नाही
  
आज तुझी वाट पहाते
काल पेक्षा जास्त आतुरतेने
रोज तूच तिचा ध्यास
ती असं कां करते
तुला कधी कळणार नाही

तुझं , "मी फक्त तुझाचं"
तिला जगण्याचा अर्थ देतं
आनंद  असो ,त्रास असो
नावं तुझं पहिलं येतं
तुला कळतयं सारं,
तिला कधी कळणार नाही

© जूही गुप्ते


Thursday, November 17, 2016

Micropoetry 14






शब्दांची फळं महाग  
भावनांचे अनेक रूप 
काळजी ,प्रेम आणि राग 
काळजी स्वभाव ,कधी सवय 
प्रेम वेडं किंवा खोटं असतं 
त्याला गोड सोबती , नसतं वय 
राग खरा असतो , एकटा असतो 
जैसीं भावना ,तैसें शब्द !!

  © Juhi Gupte

Sunday, October 16, 2016

Micropoetry- 11



तो एकटा होता वादळवाटेत 
आज कोजागिरीच चांदणं 
अवेळी आलेल्या ढगात लपलं 
चंद्र रात्रभर वाट बघतोय !!

© Juhi Gupte

Tuesday, September 8, 2015

मनासारखं


एक विचारू तुला ?
कुठलं प्रश्न आधी सुटेल 
कधी पर्यंत तुला-मला 
हे सोसावं लागेल ?

हा विचारांचा गुंता सोडवीत 
माझी घुसमट होते 
निदान तू तरी घे समझून 
अशी अपेक्षा करते 

सारं आयुष्य पुढे 
तुला आठवुन जगायच?
मनाच काय सांगू आता? 
फक्त् एकदा बघायच!!

ठरवल्या प्रमाणे आपण 
पुन्हा नाही भेटायच
विसरण्यात एकमेकाला 
थोडं थोडं आठवायच!

तुला वेड्या सारखं 
कोणी इतकं प्रेम करेल? 
का कधीकाळी सगळं
आपल्या मनासारखं घडेल !

 
© Juhi Gupte


Sunday, May 31, 2015

इतका माझा होशील का ??



तुझे  "स्वप्न "  माझ्या डोळ्याने
दिवस रात्र पाहशील का ?

श्वास माझे नावं तुझे
अशा घरात तू राहशील का ?

ओवलेले सुखं  -दुखं सारे
माझ्या वेणीत खोवशील का ?

मनात तू प्राणात तू
फ़क़्त इतका माझा होशील का?